प्राणदाता लुई पाश्चर
काही माणसे मानवजातीच्या कल्याणासाठीच जन्मतात आणि आयुष्यभर त्याच एकमेव ध्येयासाठी कष्ट करीत असतात. लुई पाश्चर त्यांच्यापैकीच एक. ज्यावेळेला रेल्वे गाड्या प्रवाशांना वेगाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत पोहोचवत होत्या, तारायंत्रे जलद गतीने संदेश पोहचवत होती, वैज्ञानिक किरणोत्सर्गाने अणूपेक्षाही लहान कणांचा शोध घेत होते, त्यावेळेला त्यांच्या तुलनेत वैद्यकशास्त्रात अजूनही अंधारयुगच होते. बालमृत्यूचे प्रमाणही फार मोठे होते. सुखवस्तू …